मुलींना स्वसंरक्षणाचे धडे; सायबर पोलिसांचा सुस्त्य उपक्रम

| पाताळगंगा | वार्ताहर |
आज प्रत्येक मुलगी सुरक्षित असली पाहिजे. समाजात वावरताना एखादा अनुचित प्रसंग निर्माण झाल्यास आपण स्वसंरक्षण करुन त्या कसा बचाव करु शकाते, याचे धडे खालापूर सायबर पोलिसांनी दिले. पोलीस आणि टाटा स्टील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वावोशी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोसई सरला काळे व मपोना लतिका गुरव यांनी मुलींना बडी कॉप, पोलीस काका, दामिनी पथक, डायल 112 याबाबत देऊन त्यांचे मनोबल वाढविले.

यावेळी महिला अत्याचार, बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, गुड टच बॅड टच याबाबत मार्गदर्शन करून सायबर जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थिनींना पोलीस अधिकारी महिलांचे नाव तसेच संपर्क क्रमांक देण्यात आले. यावेळी मुलींनी स्वतःचा बचाव करण्यासाठी तपस्वी गोंधळी कराटे प्रशिक्षक, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी यांच्याकडून प्रात्यक्षिकाद्वारे कराटे व संरक्षणाचे धडे देण्यात आले.
या मार्गदर्शन शिबीरासाठी टाटा स्टील फाऊंडेशनचे व्यवस्थापक भावेश रावल, तेजल पाटील, खालापूर पोलीस ठाण्याच्या पोसई सरला काळे, मपोह/हेमा कराळे, मपोना/लतिका गुरव, पोशि/समिर पवार यांच्यासह 350 शालेय मुली, शिक्षकवृंद उपस्थित उपस्थित होते.

Exit mobile version