बचतगटांना लागले दिवाळी फराळाचे वेध

पोयनाडमध्ये दिवाळीच्या फराळाचे प्रदर्शन
प्रथमच ग्राहकांना सवलतीत फराळ
। भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील सुप्रसिद्ध बाजारपेठ पोयनाड येथे प्रथमच भाकरवड गावच्या धनलक्ष्मी स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार चकली भाजणी पीठ तसेच तयार अनारसे पीठ थेट ग्राहकांना वाजवी दरात उपलब्ध करून दिले आहे.
गेल्या अनेक वर्षे हे महिला बचत गट जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली झेप फाउंडेशनला रजिस्ट्रेशन केलेले आहे. कोणत्याही प्रकारचा धार्मिक, आध्यात्मिक सामाजिक कार्यक्रम तसेच साखरपुडा, हळद, लग्न, वाढदिवस आदींच्या नाष्टा, जेवणाची ऑर्डर हा महिला बचत गट स्विकारत आहे व वाजवी दरात उत्तम सेवा देत आहेत या बचतगटात पंधरा सदस्य आहेत. त्यामध्ये अध्यक्षा उर्मिला पाटील, उपाध्यक्ष रुपाली पाटील, सुवर्णा पाटील, वैजयंती पाटील, लक्ष्मी पाटील, मंदा पाटील, समिता पाटील, नितिषा पाटील, ज्योती पाटील, जयश्री पाटील, पुष्पा पाटील, प्रीतम पाटील, प्रियंका पाटील, स्नेहल पाटील, आरती पाटील या सभासद असून या सर्वांनी एकत्र येऊन बचत गटांची स्थापना केली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी या बचत गटांनी कोणत्याही प्रकारची उलाढाल केली नाही.
मात्र यावर्षी ग्रामपंचायत पोयनाडच्या बाजारपेठ येथे आपल्या चकली पीठ व अनारसे पीठ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. या बद्दल सरपंच महोदय सदस्य यांचे धनलक्ष्मी स्वयंम सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्ष उर्मिला पाटील यांनी आभार व्यक्त केले आहे. तर या स्टॉलचे उद्घाटन सरपंच शकुंतला काकडे, किशोर पाटील, एसटीचे कंट्रोलर म्हात्रे, विजेंद्र तावडे आदींच्या हस्ते करण्यात आले.

Exit mobile version