स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष धडकणार आझाद मैदानात 

| पनवेल | वार्ताहर |

मुंबईमध्ये अदानी कंपनीच्या वतीने प्रीपेड मीटर बसवण्याचा सरकारने घाट घातला आहे. या निर्णयाचा निषेध करण्याकरता स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने या मोर्चाचे आयोजन केले आहे. या प्रीपेड मीटर मुळे वीज बिलांमध्ये भरमसाठ वाढ होणार आहे आणि हे सर्वसामान्य मध्यमवर्गीय ग्राहकांना परवडणारे नाही.  मुंबईमध्ये प्रीपेड विज बिलाचा रिचार्ज संपल्यानंतर अचानक वीज पुरवठा खंडित होऊ शकतो. अशा वेळेला रिचार्ज झाला नाही किंवा काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर अंधार पडू शकतो . त्यामुळे अशा या अडचणींमुळे, अंधारामुळे अनेक ठिकाणी खून दरोडे घातपात होऊ शकतात. त्याचप्रमाणे महिला वर्गाची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. या अंधारामुळे अनेक महिलांवर युवतींवर बलात्कार होऊ शकतात.  

दुसरा आंदोलनाचा मुद्दा असा आहे की अक्षय भालेराव या युवकाची निर्घुण हत्या करण्यात आली. परंतु आजपर्यंत या युवकाला व त्याच्या परिवाराला कोणत्याही प्रकारचे नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दलित समाजावर वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत याचा निषेध करण्याकरता या मोर्चाचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर जालना येथे पोलिसांकडून अनन्वित असा लाठीचार्ज व अत्याचार करण्यात आला. मराठा समाजावर झालेल्या या लाठीमाराचा निषेध सुद्धा या मोर्चामध्ये करण्यात येणार आहे. या मोर्चाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी केलेले आहे. या मोर्चासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पक्षाचे अध्यक्ष सागर संसारे, त्याचबरोबर युवा नेते अनिकेत संसारे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश सचिव अशोक जी वाघमारे, मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित हिरवे, पक्षाचे कार्याध्यक्ष बाळाराम जाधव, नाशिक जिल्ह्याचे नेते अरुण धिवर, पक्षाचे मुंबईचे नेते अरुण जाधव, मुंबईचे पक्षाचे नेते विजय पवार हे उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version