नेवाळी जिप शाळेत विविध उपक्रम
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील वाकस ग्रामपंचायत मधील नेवाळी येथील जिल्हा परिषद शाईत विद्यार्थ्यांना शैक्षणिक गोडी निर्माण व्हावी यासाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आले आहेत. शाळा पूर्व तयारी उपक्रमांना विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शैक्षणिक वर्ष 22 -23 शाळा पूर्व तयारीसाठी इयत्ता पहिलीत प्रवेश घेणार्या बालकांची पूर्व तयारी म्हणून शासनाने शिक्षण विभागाने राबविलेल्या उपक्रमास नेवाळी येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा पूर्व तयारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या पटांगणात दर्शनी भागात सेल्फी पॉईंट बनविण्यात आला आहे. नवीन विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची कार्यक्रमास उपस्थितीत होती. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंदू दुर्गे, सदस्य हरिचंद्र भागीत, सदस्या प्रिया भागीत, ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक पेमारे, अंगणवाडी सेविका मदतनीस यांची देखील उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती चाम्बावने, शाळेतील शिक्षक नरेश कोर, संजय थोरात आणि मनस्वी पाटील आदींनी नियोजन केले होते. या मेळाव्याला शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख रवींद्र पष्टे, अन्य शाळेच्या शिक्षिका अश्विनी थोरात यांनी पालकांना मार्गदर्शन केले.