मतदान जनजागृतीसाठी सेल्फी पॉईंट

। म्हसळाा । वार्ताहर ।

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये (दि.7) मे ला मतदान होणार आहे. या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रांताधिकारी महेश पाटील, तहसीलदार समीर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी म्हसळा तहसील कार्यालयाच्या आवारात सेल्फी पॉइंट साकारण्यात आले आहे. याचे उद्घाटन तहसीलदार समीर घारे यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी तहसीलदार गणेश तेलंगे, भालेकर, तलाठी आणी कर्मचारी उपस्थित होते. सर्व नागरिकांनी सेल्फी पॉइंटजवळ सेल्फी काढावेत आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करावेत जेणेकरुन जास्तीत जास्त लोकांना मतदानाची जाणीव होईल.

Exit mobile version