आरसीबी नव्या मालकाला विका

। बेंगळुरू । वृत्तसंस्था ।

इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेतील 30 व्या सामन्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 25 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यानंतर भारताचा टेनिस स्टार महेश भूपतीने बेंगळुरू संघाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

बेंगळुरूने आयपीएल 2024 मध्ये आत्तापर्यंत 7 सामने खेळले असून त्यातील 6 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच सोमवारी झालेला पराभव बेंगळुरूचा सलग पाचवा पराभव होता. दरम्यान, या सामन्यातील बेंगळुरूच्या पराभवानंतर भूपतीने पोस्ट करत बीसीसीआयला विनंती केली आहे की, बेंगळुरूला एका चांगल्या संघमालकाला विका. भूपतीने लिहिले की, खेळाच्या, आयपीएलच्या आणि चाहते व अगदी खेळाडूंच्या भल्यासाठी बीसीसीआयने आरसीबीची विक्री एका नव्या मालकाला करणे गरजेचे आहे, जो दुसर्‍या संघांप्रमाणे या संघालाही एक चांगली स्पोर्ट्स फ्रँचायझी बनवण्याची काळजी घेईल.

Exit mobile version