देशी बनावटीचे पिस्तूल विकणारा अटक

मुंब्रा पोलिसांची करावाई

| पनवेल | प्रतिनिधी |

देशी बनावटीचे पिस्तूल, रिव्हॉल्वर तसेच तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी घेऊन आलेल्या गुन्हेगाराला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. राकेश सत्येंद्रकुमार मेहता (19) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मुंब्रा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुंभार यांना या गुन्ह्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास पथकाने मुंब्रा रेल्वे स्टेशन जवळील एम. गेट परिसरात सापळा लावून राकेश मेहता याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक देशी बनावटीचे पिस्तूल व सहा चेंबरचे रिव्हॉल्वर मिळुन आले. तसेच त्याच्याकडे तीन जिवंत काडतुसे असा 65,600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, उपआयुक्त गणेश गावडे, सहाय्यक पोलिस आयुक्त विजयसिंह भोसले कळवा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सपोनि अजय कुंभार, सपोउपनिरी दिपक जाधव, पोलिस अंमलदार अजिज तडवी, सतिश खाबडे, तेजस परब, रोशन कदम, कृष्णा आव्हाड यांनी केला असुन पुढील तपास सपोनि अजय कुंभार करीत आहेत.

Exit mobile version