महिलांचे आरोग्य विषयावर चर्चासत्र

| नागोठणे । वार्ताहर ।
महिला आरोग्य व त्यांना असलेले समस्या तसेच महिलांना होणारे कॅन्सर सारखे रोग यावर शनिवार दि. 16 जुलै रोजी चर्चा करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हिबा सद्दाम दफेदार यांनी उपस्थित विद्यार्थिनींना योग्य डाएट तसेच सर्व्हायकल कॅन्सर बद्धल माहिती देऊन विद्यार्थिनींना योगासन करून दाखविल्या नंतर सदृढ आरोग्यासाठी महिलांनी नियमित योगासने कारवीत असा सल्ला मौलिक सल्ला देखील यावेळी डॉ. हिबा दफेदार यांनी दिला. दरम्यान मेन्स्ट्रुअल हेल्थ, प्रिमेन्स्ट्रुअल सिन्ड्रोम, अनेमिया, पि सि ओ एस व पि एम एस, बी म आय ,व्यकसिनचे महत्व काय आहेत अशा अनेक विषयावर डॉ. हिबा दफेदार यांनी चर्चा केली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु. स्वाती शर्मा हिने केले व उपस्थितांचे अभार अनुजा वाटवे हीने मानले. डॉ. स्मिता चौधरी,ज्योती पाटील, चैत्राली पाटील, डॉ. मनोहर शिरसाठ, डॉ. विकास शिंदे, रूचीता निकम सह सर्व स्वंयसेवक विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version