बाळाराम पाटील यांना विधानसभेत पाठवाः आ.जयंत पाटील

| पनवेल | प्रतिनिधी |

शेकापची ताकद अद्याप संपलेली नाही. याच ताकदीच्या जोरावर बाळाराम पाटील यांना पनवेल विधानसभा मतदार संघातून विधानसभेत पाठवा, असे आवाहन शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होत. त्याप्रसंगी आमदार जयंत पाटील बोलत होते.

शेकाप हाच जनतेसाठी सर्वसमावेशक पर्याय आहे. शेकापने नेहमीच कष्टकरी, शेतकरी आणि वंचितांचे प्रश्न सोडवले आहेत. विधान परिषदेत बाळाराम पाटील यांनी विविध प्रश्नांना वाचा फोडली आहे. परभवानंतर देखिल ते प्रश्न सोडवण्यासाठी तप्तर आहेत. 2024 मध्ये इंडिया आघाडीची सत्ता येणार असल्याने आम्ही नैना आणि मुंबई ऊर्जा प्रकल्पाला हद्दपार करु, अशी ग्वाही आमदार जयंत पाटील यांनी दिली.

इंडिया आघाडीत घटक पक्षातील काँग्रेस नेते महेंद्र घरत, शिवसेना नेते बबन पाटील, महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी नितिन बानगुंडे यांचे व्याख्यान झाले.

Exit mobile version