ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

| पुणे । प्रतिनिधी ।

ज्येष्ठ अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले (77) यांचे निधन झाले. त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. 5 नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयोपरत्वे प्रकृती खालवल्याने गेली पंधरा दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु औषधांचा कोणताही सकारात्मक परिणाम होत नसल्याने काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार वाजता बालगंधर्वमध्ये अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवण्यात येईल. आज संध्याकाळी वैकुंठात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

Exit mobile version