। पनवेल। प्रतिनिधी।
अज्ञात वाहनाच्या धडकेत 73 वर्षीय मंगेश सालकर यांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी अनोळखी वाहन चालकाविरुद्ध सोमवारी (दि. 8) गुन्हा दाखल करण्यात आला. मंगेश सालकर हे 11 ऑगस्ट रोजी चालण्यासाठी गेले होते. ते रात्री उशिरापर्यंत घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला असता एमजीएम हॉस्पिटल सीबीडी येथील स्टाफ ने कॉल उचलला आणि त्यांच्या पतीचा अपघात झाला असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले. त्या रुग्णालयात पाहण्यासाठी गेल्या असता त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात मोटर वाहनाने निळकंठ स्वीट मार्ट खारघर येथे त्यांना ठोकर दिली. महिन्यानंतर वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू
