ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल तालुक्यातील बोर्ले गाव येथे राहणारे 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे कल्याण येथे नातेवाईकांकडे गेले असता ते अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली. हरिश्‍चंद गायकवाड (64), उंची पाच फूट, रंग सावळा, केस काळे-पांढरे, उजवा डोळा काळा व डावा डोळा अंध आहे. बांधा सडपातळ आहे. अंगात रंगीबेरंगी फुलांचा शर्ट व काळी फुल पॅन्ट, हातातील बोटात पिवळ्या धातूची अंगठी असून, त्यांना मराठी भाषा बोलता येते. याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे 022-27452444 किंवा पोहवा धनाजी तांडेल यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version