ज्येष्ठांनी घेतला वर्षा सहलीचा आनंद

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील शहाबाज येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेच्यावतीने वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वेगवेगळ्या धार्मिक स्थळांना भेटी देत ज्येष्ठांनी सहलीचा आनंद लुटला. खालापूर तालुक्यातील नढाळ येथील श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर येथे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी पाच मंदिरांचा समूह आहे. श्रीसाईबाबा, श्रीगणपती, श्रीहनुमान, श्रीनढाळेश्वर आणि भवानी माता या देवतांची मंदिरे आहेत. पर्यटकांसाठी सुंदर आणि शांत ठिकाण आहे. सकाळी महडच्या वरद विनायकाचे दर्शन घेऊन सहलीची सुरुवात झाली. परतीच्या प्रवासात खोपोलीच्या गगनगिरी महाराजांच्या आश्रमाला भेट दिल्यानंतर सहलीची यशस्वी सांगता झाली.

Exit mobile version