आवरे येथे सुरु होणार वरिष्ठ महाविद्यालय

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील आवरे गावाचे शिक्षकमित्र तथा प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी स्थापन केलेल्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेमार्फत 2024-25 या शैक्षणिक वर्षात आवरे येथे नवीन महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई विद्यापीठामार्फत महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडे इरादापत्र मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. 15 फेब्रुवारीच्या शासन निर्णयाद्वारे हा प्रस्ताव मंजूर करून संस्थेस शिक्षकमित्र बाळासाहेब म्हात्रे कॉलेज ऑफ आर्टस, सायन्स अँड कॉमर्स या नावाने नवीन वरिष्ठ महाविद्यालय सुरु करण्यास इरादापत्र मंजूर करण्यात आले आहे. या वरिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे उरण, पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचा शिक्षणासाठी फायदा होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे संस्थेच्या विश्वस्त मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Exit mobile version