| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव विधी सेवा समिती, वकील संघटना माणगाव व अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर व 35 वर्ष कार्यकाळ पूर्ण झालेल्या ज्येष्ठ वकिलांचा सत्कार समारंभ भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवार, दि.27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता.
ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. प्रकाश ओक, अॅड. डी.बी. विद्यासागर, अॅड. उदय अधिकारी, अॅड.एच.ए. जालगावकर, अॅड. राजीव साबळे, यांचा जिल्हा न्यायाधीश 1 तथा विधी सेवा समिती माणगाव अध्यक्ष एन.एस.कोले, जिल्हा न्यायाधीश 2 माणगाव हर्षल भालेराव, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर माणगाव गजानन फुलझलके, दिवाणी न्यायाधीश क स्तर माणगाव अनिल सटोटे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच विधी परीक्षेत तृतीय वर्षात प्रथम पाच आलेले विद्यार्थी अनुक्रमे कुलकर्णी मानसी विकास छाया, सकपाळ दीपक विजय सुनीता, पाटील मयुरी राजू कुमुदिनी, धामणकर केतकी कौस्तुभ सुलभा, पवार रुपाली संताजी सुगंधा यांचा सत्कार जेष्ठ विधिज्ञ अॅड. प्रकाश ओक, अॅड. डी.बी. विद्यासागर, अॅड. उदय अधिकारी, अॅड. एच.ए. जालगावकर, माणगाव वकील बार संघटनेचे अध्यक्ष अॅड. महेंद्र मानकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.