| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबागमधील ज्येष्ठ प्रसिद्ध छायाचित्रकार वामन पाटील यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले. निधनासमयी ते 89 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. वामन पाटील हे एक नखशिखांत कलाकार होते.
वामन दामोदर पाटील हे मुळचे अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील रहिवासी आहेत. ते सुरुवातीला कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात अकाऊंटट होते. वाचन, लेखन व छायाचित्र काढण्याची त्यांना आवड होती. त्यामुळे वेगवेगळ्या वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून त्यांनी काम केले. प्रेमळ, व मनमिळावू स्वभावाचे असलेले वामन पाटील यांनी अलिबागसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात छायाचित्रकार म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने त्यांनी त्यावेळी जिल्ह्यात फोटोग्राफी केली होती. ते सोमवारी त्यांचे वृद्धपकाळामुळे निधन झाले. अलिबागमधील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.







