ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अर्जुन येरापले कालवश

। पाली । वार्ताहर ।
नवगाव मराठा समाज सुधागड-रोहाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक गोंडाळे गावचे राहिवासी अर्जुन श्रीपत येरापले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. उत्कृष्ट भाषाशैली, प्रभावी व परखड बोलणे हि त्यांची खास ओळख. समाजाप्रती असलेली निष्ठा व प्रेम यामुळे त्यांनी समाजाची अविरत सेवा केली. त्यांच्या या चांगल्या कर्तृत्वाने त्यांनी नवगाव मराठा समाज सुधागड रोहा या समाजातील बांधवांच्या घराघरात व तरुणांच्या हृदयात आपले स्थान मिळविले. त्यांच्या पश्‍चात पाच मुलगे, दोन मुली, सुना,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य रविवार दि.22 रोजी त्यांच्या राहत्या घरी गोंडाळे येथे होणार आहे.

Exit mobile version