| अलिबाग | प्रतिनिधी |
विधवा महिलेशी शारिरीक सबंध ठेवून तिला गरोदर ठेवली. तिच्याशी लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केली. ही घटना अलिबागमध्ये घडली असून, याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेच्या पतीचे निधन झाले आहे. ती एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने त्या महिलेशी ओळख करून तिचा विश्वास संपादन केला. 15 मार्च ते 22 जून या कालावधीत त्याने अलिबागमध्ये तिला त्याच्या घरी बोलावून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यामुळे ती महिला गरोदर राहिली. ही बाब त्याच्या लक्षात आणून दिली. त्याने तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिले. परंतु, नंतर त्याने लग्न करण्यास नकार दिला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर महिलेने अलिबाग पोलीस ठाणे गाठले. आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून, या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खरात करीत आहेत.





