| मुंबई | प्रतिनिधी |
घाटकोपरमध्ये एका व्यक्तीने रेल्वे स्थानक परिसरामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे स्टेशन समोर असणाऱ्या स्कायवॉकला गळफास लावून या व्यक्तीने आत्महत्या केली. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये खळबळ उडाली आहे. घाटकोपर पूर्वला एन वॉर्ड कार्यालयासमोर ही घटना घडली आहे. एका व्यक्तीने घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकला गळफास लावून आत्महत्या केली. दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे कर्मचारी या व्यक्तीचा मृतदेह खाली काढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.