मुरूडमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रवचन

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

आपले आरोग्य टिकवायचे असेल तर जीवनामधील काही नीतिमूल्य आपण पाळली पाहिजेत. त्यासाठी शत्रूला, निंदकाला माफ करण्याची तयारी आपण ठेवायला पाहिजे, असा उपदेश डोंगरी मठ येथील मठाधिपती त्रीशा दत्तात्रय पाटील यांनी जैन समाज मंदिरामध्ये प्रवचन करताना भक्तगणांना केला. गुरुपौर्णिमेनिमित्त डोंगरी मठ येथे श्री स्वामी समर्थ मठामध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला. सकाळी आरती, त्यानंतर पूजन, एक वाजता महाआरती आणि आलेल्या भक्तगणांना महाप्रसाद याचा लाभ सर्वांनी घेतला. त्यानंतर सायंकाळी साडेचार वाजता जैन सालेसा भवन येथे गुरुमाऊली त्रिशा ताई यांचे जीवनातील मूल्य नैतिकता आणि जीवन कसे जगावे याविषयी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या प्रवचनाला अनेक भक्तगण उपस्थित होते.

Exit mobile version