| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. त्या पार्श्ववभूमीवर इंडिया आघाडीने आढावा बैठक घेऊन पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून मालडुंगी, धामनी, दुंदरे, विचुंबे देवद, चिखले, भिंगार आदी ग्रामपंचायतींमध्ये आढावा बैठका घेण्यात आल्या. या बैठकीस शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख व पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष बबन पाटील, माजी आ. बाळाराम पाटील, काँग्रेसचे नेते आर.सी. घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर, रघुनाथ पाटील, उपतालुका प्रमुख बबन फडके, विभागप्रमुख लता फडके, शेकापक्षाचे चिटणीस राजेश केणी, काशीनाथ पाटील, देवा पाटील, युवासेनेचे तेजेश पाटील, अभिमन्यु गोरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.