ध्येय निश्चित करा, यशस्वी व्हाल

पवन चौधरींचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

| म्हसळा | वार्ताहर |

एसएससी ही तुमच्या जीवनाची खरी पायरी आहे. यापुढे तुम्ही पुढील शिक्षणासाठी बाहेर पडाल. वेगवेगळे मित्र तुमच्या नव्याने सान्निध्यात येतील, आपल्या राहणीमानात आमूलाग्र बदल घडण्याचा हा काळ असतो, परंतु हा बदल घडत असताना नकळत आपल्याला ध्येयाचा आणि संस्कृतीचा विसर पडण्याची शक्यता असते. तेव्हा काहीही झाले तरी विद्यार्थ्यांनी ध्येयाचा पाठलाग सोडू नये आणि त्याचबरोबर आपली संस्कृती जपावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी केली. तसेच मोबाईल आणि सायबर गुन्ह्यांनापासून दूर राहण्याचे आवाहन करून स्पर्धात्मक परीक्षा देऊन जीवनाला कलाटणी देण्याचे आवाहन त्यांनी केले.
न्यू इंग्लिश स्कूल नेवरूळ येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन तथा रविप्रभा मित्र संस्थेचे संस्थापक रविंद्र लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी पोलीस निरीक्षक पवन चौधरी बोलत होते. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा मीनल मांडवकर, माजी उपसभापती मधुकर गायकर, तुकाराम दिवेकर, सुनिल दिवेकर, पोलीस पाटील निलेश लटके, शंकर कासार, संतोष उद्धरकर, श्रीकांत बिरवाडकर,सुजित काते, आत्माराम लटके, मुख्याध्यापक मिणेकर सर, सर्व शिक्षक, ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना रवींद्र लाड यांनी सांगितले की, प्राथमिक शाळांची अवस्था दिवसेंदिस फार बिकट होत असून, प्राथमिक शाळा चालल्या पाहिजेत तरच मराठी माणसाचे भवितव्य घडू शकेल. दहावीनंतर जीवन जगण्याची शैली बदलणार असून, तुम्हाला नवनवीन मित्र मिळतील, मात्र आपल्या विचारांना बगल न देता उच्च विचार अंगीकारले पाहिजेत. म्हसळा येथील समाजसेवक प्रदिप कदम यांनी विद्यार्थ्यांना लेखन पॅड आणि लिखाण साहित्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानून धन्यवाद दिले.

Exit mobile version