मेघालय राज्यात काँग्रसेला धक्का

17 पैकी 12 आमदार तृणमूलमध्ये
। शिलाँग । वृत्तसंस्था ।
मेघालय राज्यात राष्ट्रीय काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मेघालयातील काँग्रेसच्या 17 पैकी 12 आमदारांनी तृमणूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांचाही समावेश आहे.
पश्‍चिम बंगालमध्ये सत्ता कायम ठेवल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आता देशातील इतर राज्यातील राजकारणात उतरत आहेत. यात त्यांनी गोव्याच्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेतही दिले आहे. ख्दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. किर्ती आझाद यांच्यासह इतर नेत्यांच्या तृणमूल प्रवेशानंतर मेघालयातही मोठा धक्का दिला आहे.
माजी मुख्यमंत्री मुकुल संगमा यांनी तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांच्याशी सप्टेंबरमध्ये चर्चा केली होती. मात्र नेमकी कधी भेट झाली याबद्दल माहिती सांगण्यात आलेली नाही.
संगमा यांनी त्यांची भेट अभिषेक बॅनर्जी यांच्याशी झाल्याचे सांगितले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते विंसेट पाला यांच्यामुळे ते त्रासले होते, अशी माहिती सद्यःस्थितीत उजेडात येत आहे.

Exit mobile version