मुंबई-गोवा महामार्गावर कोंडीची साडेसाती

। माणगाव । प्रतिनिधी ।

शाळा विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्यानंतर गावी जाण्याची लगबग सुरु झाली आहे. त्यातच लग्नसराई सुरु झाल्याने नागरीकांनी गावाकडे कूच केली आहे. त्यामुळे माणगाव बाजारपेठेत पुन्हा वाहतुकीची कोंडी झाली असून त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव बाजारपेठेत दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी झाल्याने पर्यटक नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली असून माणगावात वाहतूक कोंडीची साडेसाती कायम राहिल्याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.

पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी रायगडात आले आहेत. दर शनिवार-रविवार व सुट्टीचा दिवस आला की, माणगाव बाजारपेठेत प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला आहे. माणगावच्या दोन्ही बाजूंनी येणार्‍या-जाणार्‍या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीशी सामना प्रवासी नागरिकांना करावा लागत आहे. यावेळी वाहतूक कोंडी सोडविताना पोलिसांची चांगलीच दमछाक होत आहे.

Exit mobile version