पहिल्या दोन तासात साडेसात टक्के मतदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघात सकाळी 7 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत 7.55 टक्के मतदान झाले. जिल्ह्यातील अलिबाग विधानसभा मतदारसंघात 8.7 टक्के मतदान, पनवेलमध्ये 6.3 टक्के मतदान, पेणमध्ये 9 टक्के मतदान, कर्जतमध्ये 6.5 टक्के मतदान, श्रीवर्धनमध्ये 7.3 टक्के मतदान, उरणमध्ये 8 टक्के मतदान, महाडमध्ये 6.5 टक्के मतदान झाले आहे. पेण आणि उरण मतदारसंघात जास्त मतदान झाल्याची माहिती आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे.

Exit mobile version