बसच्या अपघातात सात जखमी

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुक्यातील महागाव फाट्यावर सेरेनिटी फॉर्महाऊसजवळ खेमवाडी-पेण या एसटी बसचा ब्रेक फेल होऊन अपघात झाला. हा अपघात मंगळवारी (दि.27) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला. बसमध्ये 13 प्रवासी होते. त्यामधील 7 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. एसटी बसचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या बसचा क्रमांक एमएच 07 सी 7488 असून अपघातातील जखमींना पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले.

Exit mobile version