। बिहार । वृत्तसंस्था ।
बिहारमध्ये दुर्देवी घटना घडल्याचे उघडकीस आले, बिहारमधील भागलपूरमध्ये गुरूवारी एक स्फोट झाला. या स्फोटात तीन मजली इमारत जमीनदोस्त झाली असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण ढिगा-याखाली अडकले असल्याची भिती असल्याने त्या अनुशंगाने पोलिसांचे मदतकार्य सुरू आहे. ही घटना भागलपूरमधील काजवलीजक परिसरात झाली असून बॉम्ब स्फोटामुळे इमारत कोसळली असल्याचा अनेकांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता दारूगोळा, अवैध फटाके आणि देशी बॉम्बच्या सहाय्याने स्फोट झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.