9 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग । विशेष प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यात बुधवारी 27 ऑक्टोबर रोजी कोरोनाच्या सात नव्या रुग्णांची नोंद झाली असून दुर्दैवाने आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिवसभरात 9 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 हजार 498 झाली आहे. यापैकी 607 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 19 हजार 830 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 61 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.