नव साक्षरता अभियान परीक्षा
। रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात नवभारत साक्षरता अभियान राबविण्यात आले होते. या अभियान अंतर्गत नव साक्षर यांची मार्च महिन्यात लेखन, वाचन, संख्या या बाबत परीक्षा घेण्यात आली होती. प्रौढ असाक्षरांच्या पहिल्या परीक्षेत 8 हजार 414 नव साक्षर परीक्षेला बसले होते. यापैकी 7 हजार 704 निरक्षरांनी असाक्षरतेचा कलंक पुसला आहे. त्यामुळे आता त्यांना साक्षर असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे. तर 710 जणांना सुधारणा आवश्यक असल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले.
हे निकाल पुढे आले असतानाच आता 2024-25 या नव्या वर्षासाठी शिक्षकांना निरक्षर नोंदणीचे नवे टार्गेट ठरवून देण्यात आले आहे.प्रशासनाने दिलेल्या नव्या टार्गेटनुसार शिक्षकांना 15 हजार 329 प्रौढ निरक्षरांची नोंदणी करायची आहे. शिवाय जुन्या वर्षातील उर्वरित निरक्षरांसह यंदा परीक्षा घेण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे.
नवभारत साक्षरता योजनेसाठी साक्षरतेकडून समृध्दीकडे हे ब्रीदवाक्य घेतले गेले. 15 वर्षे आणि त्याहून अधिक म्हणजे 35 वर्षापर्यंतच्या निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता म्हणजे वाचन,लेखन, संख्याज्ञान, महत्त्वपूर्ण जीवन कौशल्य विकसित करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या वयोगटातील शिकाऊ व्यक्तींना मुलभूत शिक्षण देणे आहे. जिल्ह्यात आजही निरक्षक व्यक्ती आहेत. निरक्षक असल्याने अनेकांना व्यवहार ज्ञान मध्ये फसगत होत असते. अशा असाक्षर व्यक्तींना साक्षर बनविण्यासाठी नवभारत साक्षरता अभियान शिक्षण विभागातर्फे राबविण्यात आले होते. रायगड जिल्ह्यातही हे अभियान राबविण्यात आले होते. यामध्ये 8 हजार 414 असाक्षरांनी परीक्षा दिली होती. यापैकी 7 हजार 704 जण पास झाले आहेत.वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, प्रशासनिक अशा विविध कारणांमुळे साक्षरतेपासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील 12 हजार 719 जणांनी असाक्षरतेचा कलंक पुसला पुसून टाकला. आता हे सर्वजण साक्षरतेचे बिरुद आपल्या नावाबरोबर अभिमानाने मिरवणार आहेत.
जिल्ह्यात असाक्षर यांची परीक्षा घेतली होती. यामध्ये असाक्षर व्यक्तींना साक्षर बनविण्याचा उद्देश शासनाचा आहे. जिल्ह्यातील 710 आजी आजोबा याना अजून प्रगतीची गरज आहे. मार्च महिन्यात असाक्षर यांची परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये 7 हजार 704 जण उत्तीर्ण झाले आहेत. 710 जणांना प्रगतीची गरज आहे. सप्टेंबरमध्ये पुन्हा असाक्षरांना दुसर्या चाचणीत उत्तीर्ण होण्याची संधी मिळणार आहे.
केंद्राकडून राबवण्यात येणारे हे अभियान 2027 पर्यंत चालू राहाणार आहे. दरवर्षी नोंदणी व परीक्षार्थींचे टार्गेट ठरवून देण्यात येणार आहे त्यानुसार प्रशासनाला काम करावे लागणार आहे. रायगड जिल्ह्यात मागील वर्षाचा अनुभव पाहता 2024-25 या वर्षासाठी नवे टार्गेट देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात असाक्षर आजही अनेक आहेत. नवभारत साक्षरता अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवले होते. यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर पुढील वर्षासाठी 15 हजार 329 लक्षांक शिक्षण विभागाने डोळ्यासमोर ठेवले आहे.






