अडिवलीतील सात अनधिकृत गोदामे उध्वस्त;पालिकेची कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेच्या क्षेत्रात अडिवली याठिकाणी उभारण्यात आलेली 7 अनधिकृत गोदामे पालिका प्रशासनाने जमीनदोस्त केली. उपायुक्त कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाने हि कारवाई करण्यात आली होती. भले मोठे पत्राशेड असलेली ही गोदामे विनापरवाना उभारण्यात आली होती.

रायगड-ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आडिवली या ठिकाणी असणार्‍या सात अनधिकृत गोडाउनवर अतिक्रमण विरोधी विभागामार्फत तोडक कारवाई करण्यात आली आहे. महानपालिका स्थापन झाल्यावरही पूर्वी असणार्‍या ग्रामपंचायत क्षेत्रातील आडिवली, किरवली, रोहिंजण, धानसर इत्यादी परिसरात सातत्याने अनधिकृत गोडाउन बांधले जात आहेत. अशा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहेत. त्यानूसार बुधवारी हि गोदामे जमीनदोस्त करण्यात आले. दरम्यान, या बांधकाम धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु योग्य ती कागदपत्रे सादर करण्यात न आल्याने या अनधिकृत गोडाऊनवर तोडक कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली.यावेळी उपायुक्त कैलास गावडे यांच्यासह ,प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी व अरविंद पाटील उपस्थित होते.जेसीबीच्या साहाय्याने हि गोदामे जमीनदोस्त करण्यात आली यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापुढे देखील अशा अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे उपायुक्त कैलास गावडे यांनी सांगितले.

Exit mobile version