सात वर्षीय चिमुरडीचा बुडून मृत्यू

। वसई । प्रतिनिधी ।

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता वसईतील एका रिसॉर्टला पिकनिकसाठी गेलेल्या सात वर्षीय चिमुरडीचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वसई पश्चिमेकडील रानगाव मर्सेस या ठिकाणी असलेल्या एचडी रिसॉर्टमध्ये ही घटना घडली.

भांडुपच्या गणेश नगर या ठिकाणी राहणारा एक ग्रुप वसई पश्चिमेकडील रानगाव मर्सेसमधील एचडी रिसॉर्टमध्ये पिकनिकसाठी गेला होता. या ग्रुपमध्ये 14 महिला आणि 4 लहान मुलांचा समावेश होता. यावेळी सर्वजण दुपारच्या जेवणात व्यस्त असताना समीक्षा दिनेश जाधव (7) पोहण्यासाठी पाण्यात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Exit mobile version