। हैदराबाद । वृत्तसंस्था ।
देशातील सतरा वयोगटाच्या युवकांना आता मतदान करता येणार आहे.तसा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्या तरुणांनाही मतदार ओळखपत्र मिळणार आहे. त्यासाठी अर्ज करता येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.
मतदार होण्यासाठी देशातील तरुणाचं वय 18 वर्षे असणे आवश्यक नसून,आता 17 वर्षांचे तरुणही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. निवडणूक आयोगाच्या नवीन निर्देशांनंतर, 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार,निवडणूक आयुक्त अनूपचंद्र पांडे यांनी सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना यासंदर्भात तसे निर्देश दिले आहेत.
नवीन सुचनेनुसार, तरुणांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरलाही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे.त्यासाठी नवीन नोंदणी फॉर्म आणणार आहे. याकरिता तुम्हाला आधारकार्डची माहिती द्यावी लागणार आहे. मात्र, आधारकार्डची सक्ती असणार नाही.तुम्ही अर्जदार म्हणून स्वेच्छेनेही माहिती देऊ शकता.
राजीव कुमार, मुख्य निवडणूक आयुक्त