। भुवनेश्वर । प्रतिनिधी ।
बिजू पटनाईक इनडोअर स्टेडियमवर सुरू असलेल्या 40 व्या कुमार- मुली राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत रविवारी संध्याकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलांनी 36 व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करताना कुमारांचे 32 वे विजेतेपद मिळवले. अंतिम फेरीत त्यांनी दिल्लीचा 11-9 असा धुव्वा उडवला. मुलींनी 36 पैकी 32 व्यांदा अंतिम फेरीत पोहोचून 23 वे अजिंक्यपद मिळवले. या विजयासह महाराष्ट्राने सलग सातवा दुहेरी मुकुट मिळवला. कुमारांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा 11-9 असा धुव्वा उडवला. महाराष्ट्राच्या आदित्य कुदळे, सूरज झोरे, किरण वासावे, सिराज भावे (1-30, 1-50 मिनिटे संरक्षण), विवेक ब्राम्हणे यांनी केलेल्या बहारदार खेळाने महाराष्ट्राचा विजय सुकर झाला. पराभूत दिल्लीच्या रीतीक, अनलेत कुमार व मदन याने दिलेली झुंज मात्र वाया गेली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने कोल्हापूरचा 12-9 असा पराभव केला. महाराष्ट्राच्या अश्विनी शिंदे, अंकिता लोहार, संपदा मोरे, दीपाली राठोड, वृशाली भोये यांनी महाराष्ट्राला सहज विजय मिळवून दिला. तर कोल्हापूरच्या श्रेया पाटील, स्नेहा होणमुटे, वैष्णवी पोवार करताना दिलेली झुंज उपस्थित मोजक्या प्रेक्षांची दाद देऊन गेली.