ग्रामीण रुग्णालयाचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यान्वित

चंद्रशेखर सोमण यांचा यशस्वी पाठपुरावा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल उपजिल्हा रुग्णालयाच्या बंद पडलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशेखर सोमण, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम व सांडपाणी प्रक्रिया व पर्यावरण तज्ज्ञ रोहित कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुनश्च कार्यान्वित करण्यात आले. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर, शवविच्छेदन गृह, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, महिला प्रसूती कक्ष इत्यादी ठिकाणचे दररोज सुमारे 500 लीटर पाण्यावर प्रक्रिया करून ड्रेनेजमध्ये सोडण्यात येणार आहे.

सप्टेंबर 2019 मध्ये रुग्णालयाच्या लोकार्पणाच्या वेळी बसवण्यात आलेली सांडपाणी प्रक्रिया तांत्रिक कारणामुळे बंद अवस्थेत होती, त्यामुळे रुग्णालयात वापरण्यात आलेले पाणी थेट नाल्यामध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे जलप्रदूषण व पर्यायाने आरोग्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच शिवसेनेचे स्थानिक नेते चंद्रशखर सोमण यांनी हा प्रकल्प पुन्हा कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षणाची लेखी परवानगी मागितली. सर्वेक्षणाची परवानगी मिळाल्यानंतर तातडीने श्री. सोमण यांनी सा.बां. विभागाचे उपअभियंता मिलिंद कदम व तळोजा एमआयडीसी येथील पर्यावरण त रोहित कुमार यांच्याशी संपर्क करून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांच्या उपस्थितीत सदर यंत्रणेचे सर्वेक्षण करून अहवाल तयार केला. तज्ज्ञांकडून मिळालेल्या सूचना व संबंधित कंत्राटदार यांच्याशी मिलिंद कदम यांनी संपर्क साधला व योग्य ती दुरुस्ती व सुधारणा करून सदर सांडपाणी प्रक्रिया केंद्र पुनश्च कार्यान्वित करण्यात आले.

याप्रसंगी चंद्रशेखर सोमण, मिलिंद कदम, सेक्शन इंजिनिअर श्रीमती गायकवाड, सांडपाणी प्रक्रिया तज्ज्ञ रोहित कुमार तसेच रुग्णालयाचे प्रतिनिधी डॉ. गीते, विकास कोमपल्ले व संबंधित कंत्राटदार उपस्थित होते.

Exit mobile version