चारिझेन फाउंडेशनतर्फे शिवण क्लासेस

। माणगाव । प्रतिनिधी ।

सामाजिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर असणार्‍या माणगाव येथील चारिझेन फाउंडेशनतर्फे एकतानगर आदिवासीवाडीतील महिलांसाठी शिवण क्लासेस सुरु करण्यात आले आहेत. या क्लासचे उद्घाटन गुरुवारी (दि.20) मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

चारिझेन फाउंडेशन हि संस्था समाजात सामाजिक बांधिलकी राखून गेली अनेक वर्षांपासून काम करीत आहे. माणगाव तालुक्यात या फाउंडेशनने गोगरीब जनतेचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटावा या उद्देशाने गरीब जनतेला तसेच महिलांच्या हाताला काम मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. माणगाव एकतानगर आदिवासीवाडी याठिकाणी फाउंडेशन मार्फत येथील महिलांकरिता शिलाई मशीनचे प्रशिक्षण सुरु केले आहे. या महिलांना रुपाली वाघमारे या शिलाई कामाचे प्रशिक्षण देणार त्यासाठी लागणार्‍या मशनरी फाउंडेशनने उपलब्ध करून दिल्या असून, दोन महिन्यांचा हा कोर्स आहे.

Exit mobile version