। उल्हासनगर । प्रतिनिधी ।
उल्हासनगर येथे एका 3 वर्षांच्या मुलीवर 18 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची संतापनजक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उल्हासनगरमधील एका इमारतीचा वॉचमन आपल्या कुटुंबासह त्याच इमारतीच्या आवारात एका खोलीत राहतो. शनिवारी (दि. 02) वॉचमन इमारतीची साफसफाई करण्यासाठी बाहेर पडला होता. त्याचवेळी त्याच्या लहान मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून इमारतीतील एक रहिवासी पाहायला गेला असता त्याला वॉचमनच्या खोलीतून एक युवक पळताना दिसला. याबाबत त्याने वॉचमनला सांगितले. वॉचमन आणि त्याच्या पत्नीने त्वरित घरी धाव घेत मुलीची विचारपूस केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समझले. त्यानंतर त्यांनी शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जाऊन मुलीची तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अवघ्या 2 तासातच आरोपीला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.