अल्पवयीन तरुणीवर अत्याचार

। पनवेल । प्रतिनिधी ।

कामोठेत राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीने अत्याचाराच्या घटनेनंतर एमजीएम रुग्णालयात मुलीला जन्म दिला. मात्र, वजन कमी असल्याने या बाळाचा काही दिवसांतच मृत्यू झाला. कामोठे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी मोहम्मद तैसला अटक केली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पीडितेबरोबर आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित तरुणी गर्भवती राहिली. तिला एमएमजीएम रुग्णालयात दाखल केले असता सहाव्या महिन्यात मुलगी झाली. या प्रकाराची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कामोठे पोलिसांनी जुलै महिन्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. मात्र, काही दिवसातच वजन कमी असल्याने या बाळाचा मृत्यू झाला.

Exit mobile version