। तळा । प्रतिनिधी ।
तळा शहरात एक संतापजनक घटना घडली आहे. एका 33 वर्षीय तरुणाने 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तळा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळा शहरातील बाजारपेठ परिसरात एका घराचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आरोपी गणेश महादेव रसाळ (33) याने पीडित अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तसेच, पीडित मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे हलविण्यात आले आहे. घटनेतील आरोपी गणेश महादेव रसाळ याच्याविरोधात तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतिश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.