| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
41 वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मंगेश विश्वनाथ नेने (रा. नेणेपाडा, पेण) याच्याविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 41 वर्षीय महिला नवी मुंबईमध्ये राहात असून, मंगेश नेने यांनी तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले आणि नवी मुंबईतील विविध ठिकाणी येऊन शरीरसंबंध प्रस्थापित केले आणि लग्नाचा खोटा बनाव करून फसवणूक केली.





