| पनवेल | प्रतिनिधी |
कल्याण येथील तरुणाने 29 वर्षीय तरुणीला लग्नाच्या भूलथापा देऊन तिच्यावर तीन वर्षे अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विनायक बंडफ्या बेल्लाले (29) हा कल्याणमधील म्हारळ गाव येथे, तर पीडित तरुणी गोवंडी येथे राहण्यास आहे. तीन वर्षांपूर्वी विनायकने तरुणीसोबत मैत्री करून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने तरुणीचा विश्वास संपादन करून लग्नाच्या भूलथापा दिल्या. अखेर त्याने लग्नास नकार दिल्याचे तरुणीने तक्रार दाखल केली.






