। महाड । प्रतिनिधी ।
मराठी वृत्तपत्र लेखक संघाने घेतलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत महाड मधून प्रथमच प्रकाशित झालेल्या शब्द संवाद दिवाळी अंकाला सन 2022 चा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी संस्थेच्या 22 व्या वर्धापनदिन सोहळ्यात केले जाणार आहे. मुंबई येथे पत्रकार दिनी डॉ.सुरेंद्र गावसकर सभागृह दादर येथे संपन्न होत असलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी सांगितले.
दिवाळी अंक प्रकाशित करण्यात संपादक विनोद साळवी, उदय सावंत, रज्जाक करबेलकर, मुबिन देशमुख यांनी मोलाचे सहकार्य केले होते. या पुरस्कारामुळे आम्हाला नवी दिशा आणि प्रेरणा मिळाली असून अधिक उत्तम आणि विविध विषय हाताळत पुढील दिवाळी अंक प्रकाशित केला जाईल असे जनसंवाद प्रकाशनचे निलेश पवार यांनी सांगितले.







