शफाली युवा महिला संघाची कर्णधार

| नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

सलामी फलंदाज शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारी दरम्यान होणार्‍या आयसीसी 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी घोषित करण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करेल. अखिल भारतीय महिला निवड समितीने 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्‍वचषक स्पर्धेशिवाय 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणार्‍या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची निवड केली.

ट्वेन्टी-20 मालिकेसाठी संघ
शफाली वर्मा (कर्णधार), श्‍वेता सेहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी, शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

19 वर्षांखालील विश्‍वचषकाचा संघ
शफाली वर्मा (कर्णधार), श्‍वेता सेहरावत, ऋचा घोष, जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, रिषिता बासु, सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पाश्वी चोप्रा, तितास साधू, फलक नाझ, शबनम एमडी राखीव खेळाडू : शिखा, नजला सीएमसी, यशश्री.

Exit mobile version