पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अखेर नव्या पंतप्रधानांची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान मुस्लिम लीगचे नेते शाहबाज शरीफ यांची दुसऱ्यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. रविवारी मतदानानंतर नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष सरदार अयाज सादिक यांनी शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 24 वे पंतप्रधान म्हणून निवडून आल्याची घोषणा केली आहे.

इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे नेते उमर अयुब खान यांनी शरीफ यांच्याविरोधात पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला होता. रविवारी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधानपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले. यादरम्यान शाहबाज यांनी एकूण 201 मते मिळवली. तर पीटीआय पक्षाचे नेते उमर अयुब खान यांनी 92 मते मिळाली. यानंतर पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. शाहबाज शरीफ सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Exit mobile version