| लाहोर | वृत्तसंस्था |
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला असून त्यांनी स्टार फलंदाज बाबर आझमकडे पुन्हा एकदा वन डे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. याबद्दल पीसीबीने रविवारी (दि.31) माहिती दिली. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नाकवी यांनी रविवारी बाबर आझमची अधिकृतरित्या पाकिस्तानच्या वनडे आणि टी संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. याबाबत पीसीबीने ट्विटही केले आहे. दरम्यान, शाहीन आफ्रिदीला हटवून पीसीबीने पुन्हा बाबरकडे टी-20 संघाचे नेतृत्व सोपवले आहे.
शाहीन आफ्रिदीची उचलबांगडी
