। पुणे । प्रतिनिधी ।
एकाच आठवड्यात दोनदा चक्रीवादळ तयार झाले आहेत. गुलाब चक्रीवादळाचा जोर ओसरत असतानाच आणखी एका चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. आता अरबी समुद्रात शाहीन चक्रीवादळ निर्माण होणार आहे. शाहीन हे नाव ओमन देशानं दिलेलं आहे. गुरुवारी सकाळपर्यंत उत्तर अरबी समुद्रात हे चक्रीवादळ तयार होणार असून त्याचा भारताच्या किनारपट्टीवर थेट परिणाम होणार नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.