| पनवेल | वार्ताहर |
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा रोटरी वर्ष 2024-25 अध्यक्ष पदग्रहणाचा सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला. पनवेलमधील प्रथितयश मसाल्याचे उद्योजक रोटेरियन शैलेश पोटे यांनी 2024-2025 या वर्षांच्या अध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतली.
या कार्यक्रमासाठी डिस्ट्रीक्ट 3131 चे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर नॉमिनी रो. नितीन ढमाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध उद्योजक रो. काशिनाथ पोटे आणि पनवेलचे प्रसिद्ध सर्जन एझछउ-घड झऊॠ डॉ. गिरीश गुणे हे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून उपस्थितीत होते. तसेच असिस्टंट गव्हर्नर डॉ. किरण कल्याणकर, पनवेलचे माजी सभागृह नेते रोटेरियन परेश ठाकूर, माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे हेदेखील उपस्थित होते. पनवेलमधील इतर रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, इतर डिस्ट्रीक्ट डिग्निटरीज रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे इतर सभासद नस् नेटस् आणि पनवेलमधील इतर मान्यवर, निमंत्रित यांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला.