Shameful! गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने आ. दळवींचा मतदानाचा हक्क नाकारला

राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत परवानगी नाकारली
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबागचे बंडखोर आ. महेंद्र दळवी (Mahendra Dalavi)यांच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने राष्ट्रपती निवडणूकीतील (Presidential election) त्यांचे मतदान नाकारण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटातील आ. महेंद दळवी मतदान करु शकणार नाहीत. राष्ट्रपती निवडणूकीत 288 आमदारांपैकी 284 आमदार मतदान करणार आहेत. त्यापैकी एका आमदाराचा मृत्यू झाला असून अनिल देशमुख (Anil Deshmukh) व नवाब मलिक (Nawab Malik) तुरुंगात आहेत. खोट्या आश्‍वासनाच्या जोरावर आ. दळवींनी निवडणूकीत विजय मिळविला. त्यानंतर बंडखोरी करुन त्यांनी अलिबागच्या जनतेच्या भावना दुखावल्या. मात्र आज त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाल्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीचा अधिकार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मतदान केलेल्या अनेकांनी पश्‍चातापाची भावना व्यक्त केली. अलिबागच्या आमदारांची ही लज्जास्पद कामगिरी असल्याचे मत ज्येष्ठांनीही व्यक्त केले आहे.

आज राष्ट्रपती निवडणूकीची प्रक्रिया विधानभवनात सुरु आहे. एनडीएकडून द्रौपदी मुर्मू तर युपीएच्यावतीन यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेत याची मतदान प्रक्रिया सुरु आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीची मते फुटणार असल्याचा दावा केला. मात्र शिंदे गटातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यांच्यावरील एका गुन्ह्यातील आरोप सिद्ध झाल्याने ही परवानगी नाकारण्यात आली आहे.

शिवसेनेने (Shivsena) या निवडणुकीत मुर्मू यांनाच मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अ ामदारांची मतं ही यशवंत सिन्हा यांना होणार आहेत. संपूर्ण देशाचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version