। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील नवघर गावातील माजी सरपंच शेखर तांडेल यांच्यावतीने नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात शुक्रवारी (दि.26) श्री शनी महाराजांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
सलग तीन दिवस चालणार्या या मंगलमय सोहळ्यासाठी उरण तालुक्यासह नवघर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थीत राहून या अदभूतपुर्व सोहळ्याचे शाक्षीदार होऊन या भक्तीमय सोहळ्यात तल्लीन होऊन श्रवण सुखाचा आनंद लुटला. उरण तालुक्यात असे भव्यदिव्य श्री शनी महाराजांची प्राणप्रतिस्थापना होत आहे हे समजल्यावर तालुक्यासह नवघर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण तीन दिवस चाललेल्या भक्तीमय कार्यक्रमाला भाविकांची अल्लोट गर्दी झाली होती. या कार्यक्रमाचे व्यवस्थापक श्री शनी महाराज ट्रस्ट, बालाजी गृप, ग्रामस्थ मंडळ, आर.पी. गृप, ग्रामस्थ मंडळ नवघरपाडा आणि मित्रपरीवारांकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती.







