। पनवेल । वार्ताहर ।
खान्देश्वर स्थानकाचे प्रबंधक शांताराम मोरे आपल्या प्रदीर्घ कालावधीतून सेवा निवृत्त झाले आहे. खांदेश्वर रेल्वे स्थानकातील अधिकारी व कर्मचारी यांनी या निमित्ताने शांताराम मोरे यांच्या सेवा निवृत्तीचा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. मोरे 36 वर्षांपूर्वी रेल्वे विभागात नोकरी ला लागले त्या नंतर कंलबोली गुड्स डेपो, जे एन पी टी गुड्स डेपो आशा अनेक मोठ्या पदांवर कार्यरत होते. यावेळी अनिल बारटक्के, धनंजय सुरालकर, बेनहर विक्टर, सुदेशना जाधव, अक्षता बेले, ध्रुव जयप्रकाश, विशाल लोखंडे, कैलास सोनार, महाले, मणी पिल्ले, प्रवीण गोरे, जगदीश बैरवा आदि अधिकारी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.