शरदचंद्र पवार गटाची कार्यकारिणी जाहीर

| पनवेल | वार्ताहर |

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची पनवेल विधानसभा कार्यकारणी पनवेल शहर विधानसभा अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी यांनी घोषित केली. डॉ.मुनीर तांबोळी यांची पनवेल विधानसभा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून पनवेल विधानसभा हद्दीत अनेक तरुणांचा, महिलांचा पक्षात प्रवेश झाला.

यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील बोलताना म्हणाले की, संघटना जोमाने वाढत आहे. डॉ.तांबोळी यांनी प्रवेश केल्यापासून पनवेल भागात पक्षाला चांगली ताकत मिळाली आहे. अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला आहे. कामोठे येथे लवकरच पतपेढी सुरू करण्याचा मानस आहे. पुढील काळात अनेक उपक्रम राबविले जाणार असून पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम जोरात सुरू आहे, असे ही ते म्हणाले.

कार्यक्रमाप्रसंगी पनवेल विधानसभा उपाध्यक्ष पदी संजोगिता परदेशी, सरचिटणीसपदी सारिका देका, हितेंद्र निकम, सचिवपदी काशिनाथ केंडे, सह सचिवपदी इरफान तांबोळी यांना नियुक्ती देण्यात आली. सतीश पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी युवक जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल, डॉ. श्रेयस ठाकूर, पंकज शहा, नेहा किरनली, श्रियश भावसार यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version